Annasaheb Patil Mahamandal Loan Process : अण्णासाहेब पाटील महामंडळ लोन प्रोसेस
अण्णासाहेब पाटील महामंडळ लोन प्रोसेस मधील ठळक मुद्दे
- योजनेसाठी पात्रता
- योजनेची कागतपत्रे
- अर्ज करण्यापूर्वीची तयारी
- अर्ज करायची पद्धत
- लाभाचे स्वरूप
वरील दिलेल्या प्रत्येक मुद्द्यावर आपण सविस्तर बोलणार आहोत
१.योजनेसाठी पात्रता : Eligibility for Annasaheb Patil Mahamandal Loan Scheme
योजनेचा लाभ घेण्याकरीत महामंडळ द्वारे जाहीर केलेल्या पात्रता अटी खाली प्रमाणे आहेत
- योनेसाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा राहवासी असायला हवा
- पुरुष अर्जदाराची वयोमर्यादा ५० वर्ष असेल
- महिला अर्जदाराची वयोमर्यादा ५५वर्ष असेल
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ८ लाख पेक्षा कमी असावे
- अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा
- जर अर्जदार अक्षम मापदंडांच्या अंतर्गत अर्ज करत असेल तर अपंगत्व प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- एका व्यक्तीला केवळ एकदाच योजनेचा लाभ घेता येऊ शकेल
- अर्जदार दिव्यांग मापदंडाच्या अंतर्गत अर्ज करत असेल तर दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य
२.योजनेची कागतपत्रे : Documents for Annasaheb Patil Mahamandal Loan Scheme
योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे आवश्यक कागतपत्रे. अर्ज करण्यापूर्वी योग्य कागतपत्रे लक्षात घेऊन अर्ज केल्यास अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी टाळता येतात. योजनेसाठी लागणारी आवश्यत कागतपत्रे पुढे दिल्या पुढील प्रमाणे आहे.
- ओळखपत्र (अर्जदाराचे आधार कार्ड )
- बँक खाते पुस्तक
- राहवासी पुरावा : खालील पैकी एक
- लाईट बील
- गॅस कनेक्शन बुक
- तहसीलदार रहिवासी दाखल /रेशन कार्ड / भाडे करार (जर अर्जदार नातेवाईक च्या जागेत राहत असेल तर नातेसंमंध दर्शवणारा पूर्व जोडावा )
- उत्पन्नाचा पुरावा (खालील दोन्ही)
- तहसीलदार द्वारे देण्यात आलेला अद्यावत उत्पन्नाचा दाखला
- अद्यावत आय.टी.आर भरल्याची प्रत
- व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र
- दुकाने व आस्थापना नोंदणी (शॉप ऍक्ट रजिस्ट्रेशन)
- उद्यम आधार
३.अर्ज करण्यापूर्वी करण्याची तयारी :
अण्णासाहेब पाटील महामंडळ द्वारे राबण्यात येणारी योजना ही एक व्याज परतावा योजना आहे. सोप्या भाषेत समजून घ्यायचे झाले तर जेंव्हा तुम्ही एखाद्या बँक मधून कर्ज घेता तेंव्हा त्या कर्जावर आकारण्यात येणारे संपूर्ण व्याज हे महामंडळ द्वारे तुम्हाला दिले जाते. म्हणून योजने चा लाभ घेण्याआधी आपल्याला महामंडळ द्वारे जाहीर करण्यात आलेल्या बँक यादीपैकी ( बँक ची यादी येथे क्लिक करून बघू शकता ) एखाद्या बँक मध्ये जाऊन अण्णासाहेब पाटील योजने अंतर्गत कर्ज पाहिजे असल्याची विनंती करावी लागेल. आता बँक द्वारे तुमच्या व्यवसायाला कर्ज द्यायचे हे ठरवण्यासाठी काही कागतपत्राची मागणी केली जाते त्याबद्दल थोडक्यात बोलूयात. बँक अधिकारी तुम्हाला खालील दिलेल्या कागत पत्राची मागणी करू शकतात
- ओळखपत्र (अर्जदाराचे आधार कार्ड )
- व्यवसाय जागेचा पुरावा : खालील पैकी एक
- लाईट बील
- भाडे करार (जर अर्जदार नातेवाईक च्या जागेत राहत असेल तर नातेसंमंध दर्शवणारा पूर्व जोडावा )
- उत्पन्नाचा पुरावा
- अद्यावत आय.टी.आर भरल्याची प्रत
- व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र
- दुकाने व आस्थापना नोंदणी (शॉप ऍक्ट रजिस्ट्रेशन)
- उद्यम आधार
- व्यवसाय प्रकल्प अहवाल (Project Report )
प्रकल्प अहवाल हे एक व्यवसाय सुरु करण्याआधी त्या व्यवसाय संबंधी पूर्ण माहिती देणारा अहवाल म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट. यात आपण कोणता व्यवसाय करणार आहोत, व्यवसाय मध्ये मालाची अवाक जावक कशी राहील, लागणार खर्च , होणार नफा इत्यादी गोष्टीबद्दल सविस्तर माहिती दिलेली असते. एखाद्या सी.ए फर्म कडून तुम्ही हा अहवाल बनवून घेऊ शकता- सिबिल स्कोर
कर्ज मंजुरी मिळण्यासाठी अर्जदाराचा सिबिल स्कोअर चांगला असणे गरजचेच असते
४.अर्ज करायची पद्धत :
या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी महामंडळाच्या अधिकृत संकेत स्थळावर जाऊन तुम्हाला तुमचा आधार क्रमांक वापरून तुमची प्रोफाईल तयार करून घ्यायची आहे. त्यातील काही ठळक मुद्दे पुढील प्रमाणे आहे
- लॉग इन करणे : ऑनलाईन अर्ज लॉग इन साठी आधार ओटीपी पद्धत वापरली वापरली जाते. तुम्ही लॉग इन साठी तुमचा आधार नंबर टाकावा लागेल , आणि आधार सोबत संलग्न फोन वर आलेला ओटीपी देऊन आपली प्रोफाईल तयार केली जाते
- अर्ज भरणे : लॉग इन झाल्यावर तुम्हाला महामंडळ च्या विविध योजना बघायला मिळतील. तुम्हाला व्यक्तिगत व्याज परतावा योजना निवडून पुढे जायचे आहे. नंतर तुमच्या समोर एक फॉर्म येईल त्यात तुमच्या आणि व्यवसायबद्दल माहिती विचारलेली असेल ती तुम्हाला पूर्ण भरावयाची आहे. माहिती भरून झाल्यावर पुढच्या स्टेप मध्ये तुम्हाला दर्शवलेली आवश्यक कागतपत्रे दिलेल्या जागी अपलोड करावी लागेल. अपलोड झाल्यावर तुमचा व्याज परतावा अंतर्गत अर्ज जमा होईल. त्यासंबंधी माहिती एस एम एस आणि ए मेल द्वारे तुम्हाला प्राप्त होईल.
- अर्ज भरल्यानंतर मंडळ द्वारे करण्यात येणारी तपासनी : तुमचा अर्ज जमा झाल्यावर संबंधित अधिकारी तुम्ही अर्जात नुमूद केलेली माहिती आणि अपलोड केलेली कागतपत्र तपासून बघतात. योजने साठी पात्रता अटी पूर्ण असल्यास तुमचा अर्ज मान्य केला जातो.जर (अर्जामध्ये काही त्रुटी आढळ्यास त्याची पूर्तता करण्यासाठी ७ दिवसाचं कालावधी देण्यात येतो आणि त्याची माहिती तुम्हाला एस एम एस आणि इमेल द्वारे देण्यात येत ).
- LOI प्रमाणपत्र : आपला अर्ज मान्य झाल्यावर महामंडळ द्वारे आपल्याला LOI प्रमाणपत्र आपल्या प्रोफाईल मध्ये डाउनलोड साठी उपलब्ध करून दिले जाते.
- LOI चा काय उपयोग : आपल्याला हे प्रमाणपत्र प्राप्त झाले की सदर प्रमाणपत्र बँक मध्ये घेऊन जावे लागेल. या प्रमाणपात्रात कर्जावर मंडळ काही अंशी (१० लाख पर्यंत )पतहमी देत असल्याचा उल्लेख असतो. हे प्रमाणपत्र मिळाल्यावर बँक आपल्या खात्यात रक्कम जमा करते.
४.लाभाचे स्वरूप :
LOI प्राप्त झाल्यावर बँक कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात जमा करते. सोबतच मंडळ द्वारे आपल्या खात्यात पूर्ण मुदत असेपर्यंत (कर्ज मुदत जास्त जास्त ५ वर्षे ) कर्जावरील व्याजाची रक्कम खात्यामध्ये जमा केली जाते. थोडक्यात बँक द्वारे दिलेल्या कर्जावर व्याजाचा परतावा आपल्याला एकहाथी स्वरूपात मिळतो.