Annasaheb Patil Mahamandal- अण्णासाहेब पाटील महामंडळ माहिती

Annasaheb Patil Mahamandal

All important information about Annasaheb Patil Mahamandal. This article is talks about all important facts about Mahamandal. अण्णासाहेब पाटील महामंडळ बद्दल संपूर्ण माहिती. आपण खालील दिलेल्या लेखामधून यासंबंधी सर्व माहिती सविस्तर रित्या बघणार आहोत.

Important points about Annasaheb Patil Mahamandal : आण्णासाहेब पाटील महामंडळबद्दल महत्वाचे मुद्दे

अण्णासाहेब पाटील महामंडळ बद्दल माहिती बघायची असल्यास आपल्याला पुढील काही महत्वाचे पैलू लक्षात घ्यावे लागतील. पुढील मुद्द्यांच्या आधारावर आपण अन्नसाहेब पाटील महामंडळ बद्दल योग्य माहिती जाणून घेऊ शकतो 

  • आण्णासाहेब पाटील कोण होते ?
  • आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ स्थापना 
  • आण्णासाहेब पाटील महामंडळ उद्दिष्ये  
  • आण्णासाहेब पाटील महामंडळ योजना 
  • आण्णासाहेब पाटील महामंडळ सद्यस्थिती 
  • आण्णासाहेब पाटील महामंडळ अधिकृत माहिती 
 

आपण वरील प्रत्येक मुद्यावर थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करू 

१.अण्णासाहेब पाटील कोण होते ?

अण्णासाहेब पाटील यांचा जन्म २३ सप्टेंबर १९३३ रोजी पाटण तालुक्यातील मंगरुळे या गावी झाला. त्यांचा जन्म एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. गावात कामाच्या अभावामुळे त्या काळी बरेच लोक मुंबई कडे आपली पाऊले फिरवत होते. मुंबई मध्ये उद्योग जोरात वाढत होते आणि सोबतच रोजगार संधी. अशाच रोजगाराच्या शोधात माणसे मोठ्या प्रमाणात मुंबई ला स्थलांतरित होऊन तिथं मिळेल ते काम करू लागली. मुंबई मध्ये अशाच कामगारांमध्ये माथाडी कामगारची संख्या मोठ्या प्रमाणात होती. विविध गोदामे, बाजारपेठ मध्ये मजूर माथाडी कामगार म्हणून काम करत होते. माथाडी काम हे पूर्ण शारीरिक काम असून यात कसलीच हमी नव्हती जोवर शरीरात जोर आहे तोवर काम काही दुखापत झाली किंवा उतरत्या वयात या कामगारांचे खूप हाल व्हायचे. सोबतच कामासाठी हवा तसा मोबदला मिळत नव्हता. माथाडी कामगारांची अनेक प्रकारे पिळवणूक व्हायची. याच काळात अण्णासाहेब पाटील देखील मुंबई ला आले त्यांनी स्वतः मुंबई मध्ये काम करायला सुरवात केली. त्यांनी माथाडी कामगारांची होणारी पिळवणूक जवळून अनुभवली. तिथूनच त्यांनी माथाडी कामगार च्या हक्कासाठी लढायला सुरवात केली. कामगारांच्या हक्कासाठी विविध आंदोलने केली. पुढे ते माथाडी कामगार नेते म्हणून समोर आले. १९६९ मध्ये मुख्यमंत्री यशवंतराव  चव्हाण च्या काळात ५ जून १९६९ ला माथाडी कामगार कायदा अस्तित्वात आला. माथाडी कामगार मध्ये मोठ्या  प्रमाणात मराठा समाजातील लोक होते त्याच्यासाठी आरक्षण असावे याची जाणीव अण्णासाहेब पाटील यांना होती १९८० च्या दशकात त्यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलने केली. मराठा समजला आरक्षण  देण्याचा लढा खरा अण्णासाहेब पाटील यांनी सुरु केला. २२ मार्च १९८२ मध्ये मुंबई मराठा आंदोनल साठी त्यांनी मोठा मोर्चा घडवून आणला. मागण्या मान्य केल्या नाही तर स्वतः वर गोळी चालवण्याचा इशारा त्यांनी दिला. शासनाकडून त्यांच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून मागण्या अमान्य केल्या, मात्र अण्णासाहेबांनी त्यांचा शब्द राखला आणि २३ मार्च ला स्वतःवर गोळी झाडून आपले जीवन संपवले. शेवट्पर्यंत ते माथाडी व मराठा समाजासाठी आपले कार्य करत होते.

२.आण्णासाहेत पाटील आर्थिक विकास महामंडळ स्थापना

राज्यातील आर्थिक दृश्य दुर्बल घटकांचा विकास करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन निर्णय निर्णय क्र. अमामं 1998/प्र.क्र.363/रोस्वरो-1 द्वारे दिनांक २७/११/१९९८ रोजी करण्यात आली. महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचा विकास, खास करून सुशिक्षित बेरोजगार तरुण वर्गाला आर्थिक सहाय्यतेचा मार्ग मोकळा करून देण्यासाठी मंडळ स्थापन झाले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास सहायता मंडळ महाराष्ट्र कम्पनी कायदा १९५६ अंतर्गत नोंदणीकृत आहे.

३.आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ उद्दिष्ट्ये

महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना अर्थ सहायता करण्याच्या उद्देशाने महामंडळाची स्थपणा झाली. महामंडळाची उद्दिष्ट्ये 

  • आर्थिक दृश्य दुर्बल सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना व्यवसाय साठी आर्थिक मदत पुरवणे 
  • आर्थिक सहायतेतून स्वयंरोजगार तयार करणे 
  • तरुणांना व्यवसाय साठी प्रवूत्त करणे 
  • आर्थिक दुर्बल घटकांचा विकास घडवून त्यांना प्रगती साधने 

४.आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ विविध योजना

महामंडळ द्वारे स्वयंरोजगार निर्मितीसाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यापैकी काही महत्वाच्या योजना पुढील प्रमाणे.

  • व्यक्तिगत कर्ज व्याज परतावा योजना
  • गट कर्ज व्याज परतावा योजना 
  • गट प्रकल्प  कर्ज योजना 

५.आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सद्यस्थिती

आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत आतापर्यन्त जवळपस ९० हजार तरुणांना या योजनांचा लाभ झाला आहे. महामंडळ विविध जिल्हास्तरावर कार्य करत असून राज्यातील होतकरू युवक योजनांचा लाभ घेत आहेत.

आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अधिकृत माहिती

मुख्यालयाचा पत्ता : अण्णासाहेब पाटील
आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित.
जी. टी. हॉस्पिटल कंपाउंड,
बर्रुद्दिन तय्यब्बजी मार्ग,
जे. जे स्कूल ऑफ आर्ट्स च्या पाठीमागे,
सी.एस.टी स्टेशन जवळ.मुंबई 400001

दूरध्वनि क्रमांक : १८००-१२०-८०४०