व्यक्तिगत कर्ज व्याज परतावा योजना IR-I या योजने अंतर्गत अण्णासाहेब पाटील महामंडळ तर्फे तुम्हाला तुमच्या व्यवसाय साठी कर्ज घेण्यासाठी LOI प्रमाणपत्र महामंडळ द्वारे दिले जाते आणि त्याचा उपयोग करून तुम्ही कुठलीही राष्ट्रीयकृत बँक किंवा अण्णासाहेब पाटील महामंडळ योजने अंतर्गत कर्ज देणाऱ्या बँकेत कर्जासाठी अर्ज करू शकता आणि कर्ज प्राप्त करू शकता .आण्णासाहेब पाटील महामंडळ योजने अंतर्गत कर्ज देणारी तुमच्या जिल्ह्यातील बँक शोधण्यासाठी इथे क्लिक करा . तुम्ही घेतलेल्या कर्जावरील व्याज हे महामंडळ द्वारे फेडण्यात येते. म्हणजेच या योजने अंतर्गत तुमचे कर्ज हे बिनव्याजी स्वरूपाचे होऊन जाते. योजने बद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया
योजनेसाठी पात्रता
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे
- अर्जदाराची वयोमर्यादेची अट पुरुषांकरीता जास्तीत-जास्त 50 तर महिलांकरीता जास्तीत जास्त 55 वर्षे असेल
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न मर्यादेमध्ये असावे (मर्यादा मर्यादित द्वारे जारी प्रमाणपत्रानुसार परिभाषित सक्षम प्राधिकारी)
- सदर योजनेअंतर्गत अर्जदाराने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा
- अर्जदार जर अक्षम मापदंडांच्या अंतर्गत अर्ज करत असेल तर अपंगत्व प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- अर्जदार केवळ एकदाच योजनेचा लाभ घेता येऊ शकेल
- दिव्यांगाकरीता अर्ज दाखल करत असलल्यास दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य
अर्ज करण्याची प्रोसेस जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
इतर महत्वाची माहिती
- लाभार्थ्याचे कौंटूबिक वार्षिक उत्पन्न शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या नॉन-क्रिमिलेअरच्या मर्यादेत (जे रु. 8 लाखाच्या मर्यादेत असल्याचे सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र) अथवा वैयक्तीक ITR (पती व पत्नीचे) प्रमाणे वार्षिक सकल उत्पन्न (Gross Income) ग्राह्य धरण्यात येईल व निव्वळ उत्पन्न (Net Taxable Income) ग्राह्य धरण्यात येणार नाही.
- या योजनेअंतर्गत एकाच कुटूंबातील ( रक्त नाते संबंधातील ) व्यक्ती कर्जाकरीता सहकर्जदार राहीले असतील, तर अशा प्रकरणांना देखील महामंडळ मंजूरी देत आहे. परंतू अर्जदाराचे नाव प्रथम कर्जदार म्हणून असणे आवश्यक असेल.
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांने महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रात स्थायिक/ कार्यरत असलेल्या व CBS प्रणालीयुक्त बँकेकडून कर्ज घेणे अनिवार्य असेल.जवळील बँक शोधण्यासाठी येथे क्लिक करा
- दिव्यांगासाठी योजनानिहाय एकूण निधीच्या 4 टक्के निधी राखीव ठेवण्यात येईल. दिव्यांग हा व्यवसाय करण्यासाठी मानसिक दृष्ट्या सक्षम असावा.
- महामंडळाचे योजनेअंतर्गतचा लाभ हा कर्ज उचलल्यापासून 5 वर्षाकरीता किंवा प्रत्यक्ष कर्ज कालावधी यापेक्षा जे कमी असेल त्यासाठी लागू असेल.
कर्ज रक्कम रु. 10 लाखाच्या मर्यादेत, व्याज परतावा कालावधी जास्तीत-जास्त 5 वर्ष व व्याजाचा दर जास्तीत-जास्त द.सा.द.शे. १२% असेल, यानुसार जास्तीत-जास्त रु. 3 लाखापर्यतच्या व्याज रकमेचा परतावा महामंडळामार्फत करण्यात येईल. - उमदवाराने ऑनलाईन अर्ज भरुन Submit केल्याच्या पुढील सात दिवसांच्या आत ( शासकीय सुट्टया वगळून ) उमेदवार कर्ज व्याज परताव्याचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे किंवा नाही किंवा त्यामध्ये असलेल्या त्रुटींबाबत महामंडामार्फत उमेदवारास कळविण्यात येईल. तद्नंतर संबंधित उमेदवार या योजनेअंतर्गत व्याज परताव्याचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्यास संबंधित उमेदवाराला पात्रता प्रमाणपत्र (LOI) ऑनलाईन प्राप्त होईल. तसेच, त्यासमवेतच कर्ज हमी संबंधीचे शासनाचे पत्र देखील ऑनलाईन प्राप्त होईल.
- लाभार्थ्याने व्यवसाय सुरु केलेनंतर सहा महिन्यामध्ये त्याच्या व्यवसायाचे दोन फोटो अपलोड करावयाचे आहेत.
योजने साठी लागणारी कागतपत्रे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा