अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहेत
या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित उमेदवाराने मंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असावे (शासनाने निर्गमित केलेल्या नॉन-क्रिमीलेयर मर्यादेनुसार).
एकाच कुटुंबातील रक्त नाते असलेले व्यक्ती जर कर्जासाठी सहकर्जदार राहिले असतील, तर ते या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात, परंतु अर्जदाराचे नाव प्रथम कर्जदार म्हणून असावे.
लाभार्थ्याने केवळ महाराष्ट्र राज्यात कार्यरत आणि CBS प्रणाली असलेल्या बँकेतून कर्ज घेणे अनिवार्य आहे.
या योजनेअंतर्गत दिव्यांगांसाठी एकूण ४% निधी राखीव ठेवण्यात आला आहे. दिव्यांग म्हणून लाभ घेणाऱ्या उमेदवाराला मानसिक दृष्ट्या सक्षम असावे लागेल.
या योजनेचा लाभ कर्ज घेतल्यापासून पुढील ५ वर्षे किंवा कर्जाच्या कालावधीच्या मर्यादेनुसार, जोही कमी असेल, तोपर्यंत मिळेल.
कर्ज मर्यादा जास्तीत जास्त १० लाख रुपये आणि व्याज दर १२% पर्यंत असू शकतो. त्यानुसार, मंडळ द्वारे जास्तीत जास्त ३ लाख रुपये व्याज परतावा दिला जाईल.