Annasaheb Patil Loan Scheme : महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी सण १९९८ मध्ये अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ ची स्थापना करण्यात आली. या मंडळाद्वारे विविध कर्ज व्याज परतावा योजना राबल्या जातात
लाभार्थी पात्रता :
लाभार्थी पात्रता :
लाभार्थी पात्रता :
Annasaheb patil loan scheme : कर्ज व्याज परतावा योजना थोडक्यात सांगायचे झाले तर तुम्ही बँक मधून घेतलेल्या कर्जावर वर आकारण्यात येणाऱ्या व्याजाची रक्कम हि मंडळ द्वारे भरण्यात येते.म्हणजेच आपले कर्ज हे बिनव्याजी स्वरूपाचे होऊन जाते.
बँक द्वारे कर्ज मिळायची पद्धत
पुढे दिलेल्या माहिती प्रमाणे तुम्ही संबंधित बँक जवळ कर्ज घेण्यासाठी लागणारी कागतपत्रे (Loan File) जमा करून कर्जासाठी आवेदन करून शकता आणि कर्ज मंजुरी झाल्यानंतर आकारण्यात येणाऱ्या व्याजावर कर्ज परतावा योजेने अंतर्गत सूट मिळवू शकता. आपल्या जवळची कर्ज देणारी बँक शोधण्यासाठी इथे क्लिक करा . Loan File मध्ये असलेली आणि कर्ज प्रकरणासाठी लागणारी कागतपत्रे पुढील प्रमाणे.
महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजातील होतकरू मागास घटकांचा विकास करण्याच्या हि योजना एक महत्वाची भूमिका बजावत आहेत. स्वतः व्यासायिक बनून इतरांना सुद्धा रोजगार च्या संधी उपलब्ध करून एकंदरीत समाजाचा विकास घडवून आणण्याचे काम हि योजना करत आहे . पुढे दिलेल्या तक्त्या वरून तुम्ही योजनेचा आराखडा समजू शकता
एल ओ आई साठी अर्ज करणे.
कागतपत्र पडताळणी. एल ओ आई मिळवणे / त्रुटी दुरुस्त करणे
एल ओ आई घेऊन बँकमध्ये कर्ज मागणी करणे . व कर्ज मिळवणे
कर्ज तपशील आणि कर्ज समंती पत्र मंडळाकडे जमा करणे
कर्जाचे हफ्ते वेळेवर फेडून, व्याज परतावा मंडळ कडून मिळवण्यासाठी क्लेम फॉर्म भरणे व परतावा मिळवणे.
भाग १ बद्दल माहिती
Annasaheb Patil Loan Documents List : कर्ज प्रकरण बँक मध्ये सादर करते वेळी बँक मध्ये विचारली जाणारी कागतपत्रे आणि त्याबद्दल सविस्तर माहिती
१) अर्जदाराचे KYC कागतपत्र :
अर्जदाराच्या KYC कागतपत्र मध्ये अर्जदाराचे आधार कार्ड , अर्जदाराचे पॅन कार्ड आणि अर्जदाराचा पासपोर्ट फोटो. तुम्हाला हे सुनिश्चित करावयाचे आहे कि आपल्या आधार सोबत जोडलेला फोन नंबर सुरु असावा. जर फोन नंबर सुरु नसेल तर जवळच्या आधार कार्ड सेंटर ला भेट द्या
२)व्यवसाय नोंदणी चा पुरावा :
अ) दुकाने व आस्थापना नोंदणी प्रमाणपत्र : महाराष्ट्र मध्ये आपल्यला कोणताही व्यवसाय सुरु करायचा असेल तर आपल्याला त्या व्यवसायाची नोंदणी आपल्याला महाराष्ट्र सरकारच्या दुकाने व आस्थापना कायद्या अंतर्गत ( Shop Act ) अंतर्गत नोंदणी करावी लागेल.त्यासाठी तुम्ही सरकारच्या आपले सरकार संकेतस्थाळाला भेट देऊ शकता किंवा जवळच्या एखाद्या खाजगी कन्सल्टन्सी द्वारे मदत घेऊ शकता. नोंदणी झाल्यानंतर आपल्याला १६ अंकी नोंदणी क्रमांक दिला जातो. हे प्रमाणपत्र लाईफईम साठी वैध असते.
शॉप ऍक्ट नोंदणी नमुना प्रमाणपत्र बघण्यासाठी येथे क्लिक करा.
ब ) उद्यम आधार नोंदणी प्रमाणपत्र : उद्यम आधार द्वारे आपल्या व्यवसायाची नोंदणी केंद्र सरकार पातळीवर होते. उद्यम आधार नोंदणी पूर्ण झाल्यावर आपल्याला १६ अंकी उद्यम आधार नोंदणी क्रमांक दिला जातो. स्वतः उद्यम आधार नोंदणी करण्यासाठी तुम्ही उद्यम रेजिस्ट्रेशन पोर्टल ला भेट देऊ शकताजवळच्या एखाद्या खाजगी कन्सल्टन्सी द्वारे मदत घेऊ शकता.हे उद्यम आधार प्रमाणपत्र लाईफईम साठी वैध असते.
उद्यम आधार नोंदणी प्रमाणपत्र नमुना प्रमाणपत्र बघण्यासाठी येथे क्लिक करा.
३) जागा मालकीचं पुरावा : जर व्यवसाय तुम्ही स्वतः च्या जागेत करत असाल तर संबंधित वीज बिल तुम्ही जागा मालकीचं अपूर्व म्हणून देऊ शकता. जर तुम्ही व्यवसाय करण्यासाठी जागा हि भाडेतत्वार घेतली असेल तर तुमच्या जवळ भाडेकरार असणे आवश्यक आहे
४) आयटी रिटर्न : जर तुमचा व्यवसाय पूर्वी पासून सुरु असेल तर तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे आयटी रिटर्न भरलेली फाईल पण बँक मध्ये द्यावी लागेल. आयटी रिटर्न भरलेल्या कागतपत्र साठी तुम्ही सरकारच्या Income tax संकेत स्वतःला भेट देऊ शकता किंवा जवळच्या एखादया अकॉउंट कंसल्टंसी ला भेट देऊ शकता.
५) प्रकल्प अहवाल : Project report Annasaheb Patil loan scheme. आपल्या व्यवस्याबद्दल थोडक्यात पण स्पष्ट माहिती सांगणार अहवाल म्हणजेच प्रकल्प अहवाल होय. यात आपल्या व्यवसायाची कार्यपद्धती, व्यवसायाचे अर्थकारण आणि व्यवसायात मालाची आवक जावक कशी राहील या बद्दल आपण बँक ला साविस्थर माहिती देत असतो. याचा विचार करून बँक आपला व्यवसाय किती कर्जासाठी पात्र आहे.
कर्ज मंजूर झाल्यावर बँकेकडून कर्ज मंजुरी प्रमाणपत्र मिळते ज्याचा उपयोग पुढे योजनेचा लाभ घेण्यासाठी होतो ( नमुना प्रमाणपत्र बघण्यासाठी इथे क्लिक करा )
भाग २ बद्दल माहिती
अर्ज कण्यासाठी आपण नोंदणी प्रक्रिया आधीच बघितली आहे. नोंदणी केल्यावर मिळालेल्या आयडी पासवर्ड चा वापर करून आपल्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ संकेत स्थळावर लॉग इन करून. योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली दिल्या प्रमाणे प्रोसेस करायची आहे
व्याज परतावा योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला खाली दिलेली कागतपत्र संकेतस्थाळावर (udyog . mahaswayam. gov. in ) अपलोड करायची आहेत
१) बँक कर्ज मंजुरी प्रमाणपत्र : बँक कर्ज मंजूर झाल्यावर आपल्याला दिले जाते
२) व्यवसाय नोंदणी पुरावा : स्टेप १ मध्ये या बद्दल चर्चा केली आहे
३)बँक स्टेटमेंट
४)प्रकल्प अहवाल
५) व्यवसायाचा फोटो
वर दिलेली कागतपत्र आपल्याला ऑनलाईन अपलोड करायची आहेत. त्यानंतर ७ दिवस च्या आत संबंधित अधिकारी आपली कागपत्रे तपासून बघता आणि संबंधित अर्ज मंजूर झाला आहे, नाकारण्यात आला आहे किंवा अर्जामध्ये काही त्रुटी आढळली आहे याची माहिती आपल्याला दिली जाते.
मंजूर झाले असल्यास.अर्जदाराच्या खात्यावर व्याजाची रक्कम जमा केली जाते आणि सोबतच प्रोस्साहनासाठी कर्जाचा पहिले हफ्ता हा मंडळाद्वारे भरला जातो
राज्यातील आर्थिक दृश्य दुर्बल घटकांचा विकास करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन निर्णय निर्णय क्र. अमामं 1998/प्र.क्र.363/रोस्वरो-1 द्वारे दिनांक २७/११/१९९८ रोजी करण्यात आली. महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचा विकास, खास करून सुशिक्षित बेरोजगार तरुण वर्गाला आर्थिक सहाय्यतेचा मार्ग मोकळा करून देण्यासाठी मंडळ स्थापन झाले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास सहायता मंडळ महाराष्ट्र कम्पनी कायदा १९५६ अंतर्गत नोंदणीकृत आहे.
महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना अर्थ सहायता करण्याच्या उद्देशाने महामंडळाची स्थपणा झाली. महामंडळाची उद्दिष्ट्ये
- आर्थिक दृश्य दुर्बल सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना व्यवसाय साठी आर्थिक मदत पुरवणे
- आर्थिक सहायतेतून स्वयंरोजगार तयार करणे
- तरुणांना व्यवसाय साठी प्रवूत्त करणे
- आर्थिक दुर्बल घटकांचा विकास घडवून त्यांना प्रगती साधने
मुख्यालयाचा पत्ता : अण्णासाहेब पाटील
आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित.
जी. टी. हॉस्पिटल कंपाउंड,
बर्रुद्दिन तय्यब्बजी मार्ग,
जे. जे स्कूल ऑफ आर्ट्स च्या पाठीमागे,
सी.एस.टी स्टेशन जवळ.मुंबई 400001
दूरध्वनि क्रमांक : १८००-१२०-८०४०
महत्वाची सूचना : हे संकेतस्थळ शासनाचे अधिकृत संकेत स्थळ नाही. या संकेत स्थळाचा उद्देश फक्त संबंधित योजना बद्दल माहिती पुरवणे हा असून इथे उपलब्ध माहिती आणि प्रत्यक्ष माहिती मध्ये फरक असू शकतो. इथे या संकेत स्थळावर उपलब्ध माहिती हि कुठलाच आर्थिक सल्ला नाही. संकेत स्थळाचा उपयोग करून कुठलाही व्यवहार किंवा व्यवसाय सुरु करताना वाचकाने आपल्या सत्सक विवेक बुद्धीचा उपयोग करावा